Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

अब्राहम लिंकन- अमेरिकेची फाळणी मोडणारा महान नेता

मला जे जे माहीत असावंसं वाटतं, ते ते पुस्तकात सापडतं.’’ पुस्तकांशी इतकी घट्ट मैत्री असलेला हा अकरा वर्षांचा मुलगा, म्हणजेच पुढे चालून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले ‘अब्राहम लिंकन’! एका माणसाने दुसऱ्या माणसावर मालकी दाखवणं खरोखरच योग्य नाही.’’ माणसाने मोठ्या वृक्षासारखं असावं. आयुष्यात ऊन, पाऊस, वारा, वादळं येतात. मग वृक्षाप्रमाणे शक्ती आजमावता येते. आतला तंतू निर्मळ आहे की पोखरलेला आहे, हे समजतं.’’ तुम्ही काही लोकांना नेहमी फसवू शकता. सर्व लोकांना काही काळ फसवू शकता, पण सर्व लोकांना सदासर्वकाळ फसवत राहणं कोणालाच शक्य नाही.’’ ‘तुझ्या अपार दुःखाचं सांत्वन करायला माझे हे शब्द किती अपुरे आणि निष्फळ आहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे. तो सर्वशक्तिशाली ईश्वर तुझं हे दुःख हलकं करो आणि तू गमावलेल्या तुझ्या प्रिय मुलांच्या आठवणी तुला सतत आनंद देत राहोत. तुझा हा त्याग सर्वश्रेष्ठ ठरो...’