Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

कॅप्टन विक्रम बत्रा

विषय :-कॅप्टन विक्रम बत्रा भारतीय सैन्याच्या अदम्य साहसाचा अनेक कहाण्या आहेत ज्याने,काही क्षणासाठी का होईना आपण भारावून जातो!हि अशीच एक कहाणी अश्या एक सैनिकाची ज्याचे नाव घेतले कि आजहि आपोआप ओठावर बोल येतात,'ये दिल मांगे मोर'. हि कहाणी आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांची! ९ सप्टेंबर १९७४ साली हिमाचल मध्ये कमल कांत आणि गिरिधारी लाल बत्रा यांच्या पोटी विक्रम चा जन्म झाला आणि बरोबर १४ मिनिटाने विशाल म्हणजे विक्रम च्या जुळ्या भावाचा जन्म झाला ,विक्रम अगदी लहानपणा पासून त्यांच्या शाळेत एक हुशार आणि प्रत्येक गोष्टी मध्ये उत्सहाने भाग घेणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता.उत्तर भारतातील सर्वोत्तम NCC कॅडेट म्हणून त्याने नाव अगदी लहानपणीच कमावले आणि वयाच्या १२ व्या वर्षी कराटे मध्ये ग्रीन बेल्ट सुद्धा मिळवला विक्रम हा राष्ट्रीय पातळीचा टेनिस पटू सुद्धा होता. लहानपणा पासून देशभक्त असलेल्या विक्रम ने आर्मी जोईन करायचे ठरवले आणि त्याने CDS हि परीक्षा दिली. विक्रम च्या बॅचलर डिग्री वर त्याला हाँग कोन्ग स्थित मर्चन्ट नेव्ही च्या कंपनीत भरपूर पगार असलेली नोकरी लागली होती ...

सरफ़रोशी की तमन्ना ११ जून

अगदी सहजतेने मनातील देशभक्ती शायरीच्या आणि लेखणी च्या माध्यमातून उतरवणारे, तितक्याच निपुणतेने इंग्रजांविरुद्ध बंदूक चालवणारे रामप्रसाद बिस्मिल यांचा आज जन्मदिन. लेखणी आणि बंदूक हे दोन्ही परस्परविरोधी शस्त्र सहसा एकत्रित येऊ शकत नाहीत. पण बिस्मिल अपवाद होते. क्रांतीकारकांना शस्त्रास्त्रे विकत घेण्यासाठी आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) ही संघटना चालविण्यासाठी पैश्याची गरज होती. बिस्मिल शायरी आणि पुस्तके लिहून प्रसिद्ध करायचे आणि त्यातून येणाऱ्या मिळकतीने संघटनेसाठी शस्त्र खरेदी करीत होते. मागितल्याने स्वातंत्र्य मिळणार नाही त्यासाठी रक्त सांडवणे गरजेचे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच एकमेव ब्रीद मानणारी ही संघटना होती. इंग्रज सरकारला जबर धक्का द्यायचा म्हणून 1925 मध्ये काकोरी रेल्वे लूट घडवून आणली. याच घटनेतील मुख्य आरोपी म्हणून बिस्मिलला इंग्रज सरकारने फाशी दिली. वक़्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमाँ। हम अभीसे क्या बताये क्या हमारे दिलमें है।सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमे है। देखना है जोर कितना बाजू ए महफ़िल में है। प्रसिद्ध शायर बिस्मिल अजीमाबाद...

पन्हाळ गड

चित्रकार वासुदेव कामत यांची सुरेख रचना. पन्हाळगडावरील वेढा फोडून विशाळगडाकडे जाताना वाटेतील एका प्रसंगावर काढलेले हे तैलचित्र. सिद्दी जौहरचा खडा पहारा, पाच महिने गडांवर अडकून पडलेले महाराज आणि जेधे-बांदलांची एक तुकडी. सिद्दी जोहरच्या मदतीला इंग्रजांच्या तोफा होत्या पण मावळ्यांनी कडवी झुंज देवून गड लढतां ठेवलां आणि आदिलशहाची फौज एक इंच हि पुढे सरकू शकली नाही. पण या काळात बाहेरुन मावळ्यांनी वेढा तोडण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यात त्यांना अपयश आले, अगदी नेताजी पालकर यांना देखील. गडांवर हळूहळू रसद संपु लागली. दारूगोळा देखील मुबलक नव्हता मग राजांनी निर्णय घेतला कि तो वेढा फोडून जायचे विशालगडाकडे. मराठा मुलखातील अजस्त्र पाऊसाने आदिलशाही सैनिक थोडे हवालदिल झाले होते याचा फायदा घेत एका रात्री महाराजांनी काही मावळ्यांना एकत्र घेऊन गडउतार व्हायचे ठरवले. हेरांनी पारखुन ठेवलेल्या आडवाटेने महाराज आणि मावळे उतरतानाचा हा फोटो आहे खुप भावनिक करुन जातो. निरक्षण केल्यास तुम्हास शिवा काशीद दिसेल, बाजीप्रभू आणि जेधे-बांदलांचे मावळे. चेहरामुद्रा थोडीसी चिंतित आणि भयभीतही. काळजी राजांबद्दल आणि...

Birsa Munda, a tribal legend

Even though he lived for just 25-years, Birsa Munda is one legend who has made a long-standing impact on India’s fight against the British. A young freedom fighter and a tribal leader, whose spirit of activism in the late nineteenth century, is remembered to be a strong mark of protest against British rule in India. Birsa Munda – a tribal freedom fighter, religious leader and a folk hero belonged to the Munda tribe. Birsa Munda spearheaded an Indian tribal mass movement that arose in the tribal belt of modern Odisha, Bihar, Jharkhand, Madhya Pradesh and Chattisgarh in the late 19th century during the British Raj. Munda is one of the most important faces of Indian tribal movements against the British, who inspired various tribes not only Mundas but also Kharias and Oraons, who accepted him as their leader. Birsa Munda was born at Ulihatu in the Bengal Presidency (presently in Jharkhand) on 15 November 1875 into a Munda family. Munda spent his childhood amidst poverty in a ty...