विषय :-कॅप्टन विक्रम बत्रा
भारतीय सैन्याच्या अदम्य साहसाचा अनेक कहाण्या आहेत ज्याने,काही क्षणासाठी का होईना आपण भारावून जातो!हि अशीच एक कहाणी अश्या एक सैनिकाची ज्याचे नाव घेतले कि आजहि आपोआप ओठावर बोल येतात,'ये दिल मांगे मोर'. हि कहाणी आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांची!
९ सप्टेंबर १९७४ साली हिमाचल मध्ये कमल कांत आणि गिरिधारी लाल बत्रा यांच्या पोटी विक्रम चा जन्म झाला आणि बरोबर १४ मिनिटाने विशाल म्हणजे विक्रम च्या जुळ्या भावाचा जन्म झाला
,विक्रम अगदी लहानपणा पासून त्यांच्या शाळेत एक हुशार आणि प्रत्येक गोष्टी मध्ये उत्सहाने भाग घेणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता.उत्तर भारतातील सर्वोत्तम NCC कॅडेट म्हणून त्याने नाव अगदी लहानपणीच कमावले आणि वयाच्या १२ व्या वर्षी कराटे मध्ये ग्रीन बेल्ट सुद्धा मिळवला
विक्रम हा राष्ट्रीय पातळीचा टेनिस पटू सुद्धा होता. लहानपणा पासून देशभक्त असलेल्या विक्रम ने आर्मी जोईन करायचे ठरवले आणि त्याने CDS हि परीक्षा दिली.
विक्रम च्या बॅचलर डिग्री वर त्याला हाँग कोन्ग स्थित मर्चन्ट नेव्ही च्या कंपनीत भरपूर पगार असलेली नोकरी लागली होती पण
आर्मी मध्ये जाण्यासाठी म्हणून त्याने ती नाकारली, याच प्रसंगाचा दाखल देत त्यांची आई कमल म्हणतात,"जेव्हा त्याने हा निर्णय घेतला तेव्हा तो म्हणाला, आई पैसे हीच मोठी गोष्ट नाही या जगात,मला या देशासाठी काहीतरी करायचा आहे,काहीतरी विलक्षण,काहीतरी मोठं' तेव्हा त्याला काय माहित होते कि हे बोल सिद्ध करण्यासाठी म्हणून त्याला किती मोठी किंमत मोजावी लागणार आहे ते.१९९६ मध्ये विक्रम CDS परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि मिलिटरी अकॅडमि मध्ये लेफ्टनंड म्हणून दाखल झाला.
त्याची पहिली पोस्टिंग हि काश्मीर मधील बारामुल्ला जिल्ह्यातील सपोर या गावात झाली.तीन वर्ष उलटली आणि १९९९ साली कारगिल चे युद्ध चालू झाले,याच वेळेला विक्रम त्याची कमांडो ट्रेनिंग पूर्ण करून काही दिवसांकरिता त्याच्या घरी अर्थात हिमाचल ला गेला होता. त्याच्या मित्रांसोबत तो एका कॉफी शॉप मध्ये असताना त्याचा मित्र त्याला म्हणाला
'विक्रम,युद्ध चालू झालं आहे,कुणासठाऊक तुला केव्हा बोलावलं जाईल,काळजी घे'
यावर विक्रम चं उत्तर ऐकून
त्याचे मित्र अचंबित झाले,
"काळजी नसावी,एक तर मी हातात तिरंगा घेऊन येईन किंवा मी तिरंग्या मध्ये बांधून येईन,पण इथे पुन्हा येईन हे निश्चित".
काहीच दिवसात विक्रम ला पोस्टिंग ला रिपोर्ट होण्याचा आदेश मिळाला आणि १ जून ९९ ला विक्रम पुन्हा एकदा काश्मीर मध्ये रुजू झाला.विक्रम च्या युनिट ला कारगिल मध्ये थांबण्याचे आदेश मिळाले.
१८ दिवसानंतर म्हणजे १९ जून १९९९ ला या युनिट ला पॉईंट ५१४० हा पाकिस्तान च्या ताब्यातून परत घेण्याचे आदेश मिळाले.हे विक्रम चे युद्धातली पहिली मुख्य लढाई होती.
पाकिस्तानी सैन्याने कडे उंचीचा फायदा असला तरी योग्य रणनीतीमुळे 13 J & K Rifles ने हि लढाई आरामात जिंकली आणि पॉईंट ५१४० भारतात सामील केला,ज्याचे नाव पुढे जाऊन 'TIGER POINT ' असे ठेवण्यात आले.
विक्रम च्या नेतृत्वाखाली एकाही सैनिकाला जीव गमवावा लागला नाही,या आनंदात विक्रम त्याच्या एका ऑफिसर ला एक वाक्य म्हणाला जे कारगिल युद्धाचे घोषवाक्य झाले,"ये दिल मांगे मोर".
२० जून ला विक्रम ने त्याच्या वडिलांना फोन करून हि वार्ता सांगितली आणि घरात आनंदाचे वातावरण पसरले !
थोडे दिवस गेले आणि २९ जून ला विक्रम च्या युनिट ला पुन्हा एकदा बोलावले गेले आणि आता मात्र एका खर्यार्थाने कठोर असलेला पॉईंट ४८७५ काबीज करण्यासाठी. पॉईंट ४८७५ हा समुद्रसपाटी पासून १७००० फूट उंच असून ८० डिग्री चा स्लोप असलेला या युद्धातील सर्वात अवघड पॉईंट मानला जात.
विक्रम ला हे सांगितल्यावर तो आनंदी झाला,हे विलक्षण धैर्य पाहून त्याचे सिनिअर ऑफिसर आश्चर्यचकित झाले
जुलै ६ ला विक्रम आणि त्याची युनिट ह्या पॉईंट ला जाण्यासाठी चालू लागली.१६००० फुटावर आधीपासूनच पाकिस्तानी सैन्य तैनात होते,ते जणू वाटच पाहत होते !
कुठून तरी बातमी शत्रूच्या गोटात पोहोचली कि 'भयंकर शेर शाह( विक्रम बात्राला दिलेले code name) इथेच जवळ कुठेतरी आहे त्याच्या युनिट सोबत.पाकिस्तानी सैन्याने रात्रीतून अंधाधुन गोळीबार चालू केला,
ग्रेनेड्स फेकले पण शेर शाह( विक्रम) ने त्याची युनिट बरोबर या सगळ्यापासून वाचवून ठेवली होती.
विक्रम त्याच्या साथीदारासोबत ( कॅप्टन अनुज नैय्यर) हळू हळू करत शत्रूच्या नाकाखाली जाऊन पोहोचला आणि अचानक हल्ला केला
सगळे जण पाकिस्तानी सैन्यावर असे काही कोसळले कि पाकिस्तानी बुडाला पाय लावून पळत सुटले,आपले सैनिक युद्धात इतके बेभान झाले होते कि अगदी हाताने सुद्धा शत्रूला त्यानें मृत्युमुखी पोहचवले.
पॉईंट ४८७५ आपण काबीज केलाच ! सगळे जण आनंदात होते,हि लढाई संपल्यात जमा होती,तेवढ्यात कुठून तरी एक ग्रेनेड तिथे पडला आणि विक्रम च्या जुनिअर चा पाय या स्फोटात गेला,हे दृश्य पाहून विक्रम त्याच्या कडे पळत गेला विक्रम त्याच्या दिशेने धावला.
सुभेदार त्याला विनंती करत होता कि 'कप्तान साब आप जाओ,सबको लेके जाओ' पण विक्रम त्याला बघून म्हणाला 'तू बाल बच्चेदार है,पीछे हट"(तुला पोरं बाळ आहेत,मागे सरक),विक्रम ने या सगळ्यात काही ग्रेनेड शत्रूच्या बंकर वर फेकले जवळपास ५ शत्रू क्षणार्धात मारले गेले.
विक्रम त्याच्या जुनिअर ला उचलण्यासाठी म्हणून पळत असताना कुठून तरी एक गोळी आली आणि विक्रम च्या छातीच्या आर पार झाली,विक्रम जखमी झाला असा जखमी कि थोड्यावेळात त्यानें शेवटचा श्वास घेतला,विक्रमला वीरगती प्राप्त झाली !
सूर्योदय होऊ पर्यंत भारताने पॉईंट ४८७५ पूर्णपणे काबीज केला होता परंतु भारत मातेचे दोन सुपुत्र कॅप्टन विक्रम बत्रा आणि कॅप्टन अनुज नैय्यर कायम स्वरूपाचे तिच्या कुशीत विसावले होते.भारतासाठी हा खूप मोठा विजय होता !
विक्रम च्या अंतयात्रेच्या वेळेला त्यांची आई एक वाक्य म्हणाली 'आज विक्रम गेला कदाचित म्हणूनच मला देवाने जुळी मुलं दिली,एक गेला असला तरी दुसरा मला कायम त्याची आठवण करून देईल'
हे वाक्य वाचताना माझ्या डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या आणि हि कथा जेव्हा मी पहिल्यांदा वाचली होती तेव्हा पायातले त्राण नाहीसे झाले होते.१५ ऑगस्ट १९९९ ला विक्रम बत्रा यांच्या अदम्य साहसा साठी त्याना भारतीय आर्मी मधील सर्वोच पदकाने अर्थात परमवीर चक्राने गौरवले गेले !
आपल्या सुरक्षेसाठी किती किती सैनिकांनी स्वतःचे प्राण गमावले आहेत ! भारत मातेच्या रक्षणासाठी लाखो सैनिकांनी आहुती दिलेल्या भूमी मध्ये आपण राहतो याचं भान आपल्या प्रत्येकाला असणं अत्यंत गरजेचं आहे.
,जेव्हा जेव्हा या देशाबद्दल काही गैरविचार मनात येतील तेव्हा तेव्हा ह्या कहाण्या आठवा.
या आहुत्या व्यर्थ जाणार नाहीत याची काळजी घ्या,तुम्ही सैन्यात नसला तरी सैन्यासारखे मनोबल आणि देशभक्त पिढी घडवण्यामध्ये कार्यरत राहा,
कॅप्टन विक्रम (शेर शहा) सारख्या अनेक सैनिकांच्या कहाण्या मी कायम घेऊन येत राहीन #अमर_सैनिक या हॅशटॅग अंतर्गत !
एकदा स्वतःच्या मनातल्या मनात म्हणा,
"भारत माता कि जय"
जय हिंद !