अगदी सहजतेने मनातील देशभक्ती शायरीच्या आणि लेखणी च्या माध्यमातून उतरवणारे, तितक्याच निपुणतेने इंग्रजांविरुद्ध बंदूक चालवणारे रामप्रसाद बिस्मिल यांचा आज जन्मदिन.
लेखणी आणि बंदूक हे दोन्ही परस्परविरोधी शस्त्र सहसा एकत्रित येऊ शकत नाहीत. पण बिस्मिल अपवाद होते. क्रांतीकारकांना शस्त्रास्त्रे विकत घेण्यासाठी आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) ही संघटना चालविण्यासाठी पैश्याची गरज होती. बिस्मिल शायरी आणि पुस्तके लिहून प्रसिद्ध करायचे आणि त्यातून येणाऱ्या मिळकतीने संघटनेसाठी शस्त्र खरेदी करीत होते.
मागितल्याने स्वातंत्र्य मिळणार नाही त्यासाठी रक्त सांडवणे गरजेचे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच एकमेव ब्रीद मानणारी ही संघटना होती.
इंग्रज सरकारला जबर धक्का द्यायचा म्हणून 1925 मध्ये काकोरी रेल्वे लूट घडवून आणली. याच घटनेतील मुख्य आरोपी म्हणून बिस्मिलला इंग्रज सरकारने फाशी दिली.
वक़्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमाँ।
हम अभीसे क्या बताये क्या हमारे दिलमें है।सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमे है।
देखना है जोर कितना बाजू ए महफ़िल में है।
प्रसिद्ध शायर बिस्मिल अजीमाबादी यांची ही शायरी म्हणत फासाच्या तख्तावर हसत हसत चढणाऱ्या बिस्मिलच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता.
बिस्मिलच्या कविता आजही मनाला क्रांतिकारक भुरळ पाडतात.
मिट गया जब मिटनेवाला
फिर सलाम आया तो क्या।
दिलकी बर्बादी के बाद
उनका पयाम आया तो क्या।
रामप्रसाद बिस्मिल 130 कोटी भारतीयांच्या मनात सदैव स्मरण राहतील.
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-कातिल मे है।।
✍️