Skip to main content

ATALJI- THE GREAT LEADER

आज भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींजी यांचा जन्मदिवस.
----------------------------------------
वाजपेयीजींच्या कवितांच्या काही ओळी.....

जो जितना उँचा,
उतना एकाकी होता है,
हरभार को स्वयं ढोता है,
चेहरे पर मुस्काने चिपका,
मन ही मन रोता है|
      धरती को बौनो की नाहीं,
 उँचे कद के इंसानो की जरुरत है|
इतने ऊँचे की आसमान छू लें,नये नक्षत्रों मे प्रतिभा की बीज बो लें,
     किंन्तु इतने ऊँचे भी नहीं,
     कि पाँव तले दूब ही न जमे,
     कोई काटा न चुभे,
     कोई कली न खिले|
मेरे प्रभु!
मुझे इतनी उँचाई कभी मत देना,
गैरों को गले न लगा सकूँ,
इतनी रुखाई मत देना|
अटल बिहारी वाजपेयींजी

----------***---------***-------
हम पडाव को समझे मंजिल
लक्ष्य हुआ आँखों से ओझल
वर्तमान के मोहजाल में
आने वाला कल न भुलाएँ
आओ फिर से दिया जलाएँ

आहुती बाकी यज्ञ अधुरा 
अपनों के विघ्नों ने घेरा
अंतिम जय का वज्र बनाने
नव दधीचि हड्डियां गलाएँ
आओ फिर से दिया  जलाएँ,
-------***--------***--------
भारत जमीन का टुकडा नहीं,
जीता जागता राष्ट्रपुरुष है|
हिमालय मस्तक है,कश्मीर किरीट   
पंजाब और बंगाल दो विशाल कंधे है|
पूर्वी और पश्चिमी घाट दो विशाल जंघायें है|
कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पग पखारता है|
यह चंदन की भूमी है,अभिनंदन की भूमि है,
यह तर्पण की भूमि है,यह अर्पण की भूमि है|
इसका कंकर-कंकर शंकर है,
इसका बिंन्दु-बिंन्दु गंगाजल है,
हम जियेंगे तो इसके लिये
मरेंगे तो इसके लिये|

अतिशय तरल,संवेदनशील मनाच्या अटलजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐 *अटलजी@93:  तुरूंगात, लिहल्या कविता!*


मुंबई- भारतरत्न व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे आज वयाची 92 पूर्ण करून 93 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.  वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत ज्यांच्यावर सरस्वती प्रसन्न होती, त्या अटलजींना स्मृतीभ्रम आजाराने गाठल्याने त्यांची प्रकृतीची स्थिती सध्या दयनीय आहे. 25 डिसेंबर 1924 रोजी जन्मलेल्या वाजपेयी यांनी 1998 ते 2004 या काळात देशाचे पंतप्रधानपद भूषविले. जनसंघाचे संस्थापक सदस्य असलेले वाजपेयी यांनी केंद्रामध्ये विविध प्रकारची पदे सांभाळली आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासोबतच परराष्ट्रमंत्रीपदही त्यांनी सांभाळले आहे. वाजपेयी यांनी आपल्या वक्तृत्त्व कौशल्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक हिंदी कविता लोकप्रिय ठरल्या आहेत. भारतीय संसदीय इतिहासाचे भीष्माचार्य म्हणून अटलजींचे वर्णन करण्यात येते पण एक श्रेष्ठ वक्ता, एक भावनाशील कवी म्हणून त्याची ओळख सर्वात जास्त आहे. इंदिरा गांधींनी तुरूंगात डांबले होते अटलजींना....


- अटलबिहारी वाजपेयी यांनी कानपूरमधून राज्यशास्त्रात एम.ए.ची पदवी मिळविल्यानंतर वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. 
- त्यांनी राष्ट्रधर्म, वीर अर्जुन आणि पांचजन्य या नियतकालिकांत पत्रकारिता केली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रमाताही ते सहभागी झाले. 
- त्यांची राजकीय कारकीर्द म. गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीपासून सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर 1951 मध्ये स्थापन झालेल्या ‘भारतीय जनसंघ’ या पक्षाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाट होता. 
- पक्षाचे संस्थापक नेते डॉ. श्यमाप्रसाद मुखर्जी यांचे अटलबिहारी वाजपेयी विश्वासू सहकारी होते. वाजपेयी 1957 साली पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले. 
- त्यानंतर तब्बल नऊ वेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. पक्षाध्यक्ष पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर पक्षाची धुरा वाजपेयींच्या खांद्यावर आली. 
- ते 1968 मध्ये प्रथमच पक्षाध्यक्ष झाले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी 1975 साली भारतावर लादलेल्या देशांतर्गत आणीबाणीमध्ये त्यांना दोन वर्षे कारावासात काढावी लागली.


*भाजपची स्थापना वाजपेयींनी केली-*

 
आणीबाणीनंतर आपल्या सहकाऱ्यांसह, संपूर्ण जनसंघ पक्षच वाजपेयी यांनी 1977 साली जनता पार्टीत विलीन केला.
- 1978 साली सत्तेत आलेल्या मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टीच्या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते.
- पण दोन वर्षानंतर 1980 मध्ये वाजपेयी यांनी मुंबईत नव्या भारतीय जनता पार्टीची घोषणा केली.  
- 1996 साली वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान बनले. परंतु त्यांचे सरकार केवळ 13 दिवसात कोसळले. 
- त्यानंतर 1998 साली लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने वाजपेयी पुन्हा एकदा पंतप्रधान बनले. हे सरकार पण तेरा महिनेच टिकले.
- पण याच काळात भारताने अणुस्फोट घडून आणला आणि आपले सामाजिक- वैज्ञानिक श्रेष्ठत्व सिद्ध केले. 


*पाकिस्तानशी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न-*


- अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानाशी शांतता – समझोता करण्याचा प्रयत्न केला. 
- पण पुढे पाकिस्तानात सत्तापालट झाले आणि लष्करशाही येताच कारगिलचे युद्ध झाले. 
- वाजपेयी 1999 मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. हे सरकार पाच वर्ष चालले. चांगले काम करूनही 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला व मनमोहन सिंग यांचे सरकार आले.
-  2005 साली वाजपेयी यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. वाजपेयी यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारताची प्रतिष्ठा उंचावली. 
- वाजपेयी यांची सुमारे 40 पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

कॅप्टन विक्रम बत्रा

विषय :-कॅप्टन विक्रम बत्रा भारतीय सैन्याच्या अदम्य साहसाचा अनेक कहाण्या आहेत ज्याने,काही क्षणासाठी का होईना आपण भारावून जातो!हि अशीच एक कहाणी अश्या एक सैनिकाची ज्याचे नाव घेतले कि आजहि आपोआप ओठावर बोल येतात,'ये दिल मांगे मोर'. हि कहाणी आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांची! ९ सप्टेंबर १९७४ साली हिमाचल मध्ये कमल कांत आणि गिरिधारी लाल बत्रा यांच्या पोटी विक्रम चा जन्म झाला आणि बरोबर १४ मिनिटाने विशाल म्हणजे विक्रम च्या जुळ्या भावाचा जन्म झाला ,विक्रम अगदी लहानपणा पासून त्यांच्या शाळेत एक हुशार आणि प्रत्येक गोष्टी मध्ये उत्सहाने भाग घेणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता.उत्तर भारतातील सर्वोत्तम NCC कॅडेट म्हणून त्याने नाव अगदी लहानपणीच कमावले आणि वयाच्या १२ व्या वर्षी कराटे मध्ये ग्रीन बेल्ट सुद्धा मिळवला विक्रम हा राष्ट्रीय पातळीचा टेनिस पटू सुद्धा होता. लहानपणा पासून देशभक्त असलेल्या विक्रम ने आर्मी जोईन करायचे ठरवले आणि त्याने CDS हि परीक्षा दिली. विक्रम च्या बॅचलर डिग्री वर त्याला हाँग कोन्ग स्थित मर्चन्ट नेव्ही च्या कंपनीत भरपूर पगार असलेली नोकरी लागली होती ...

सरफ़रोशी की तमन्ना ११ जून

अगदी सहजतेने मनातील देशभक्ती शायरीच्या आणि लेखणी च्या माध्यमातून उतरवणारे, तितक्याच निपुणतेने इंग्रजांविरुद्ध बंदूक चालवणारे रामप्रसाद बिस्मिल यांचा आज जन्मदिन. लेखणी आणि बंदूक हे दोन्ही परस्परविरोधी शस्त्र सहसा एकत्रित येऊ शकत नाहीत. पण बिस्मिल अपवाद होते. क्रांतीकारकांना शस्त्रास्त्रे विकत घेण्यासाठी आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) ही संघटना चालविण्यासाठी पैश्याची गरज होती. बिस्मिल शायरी आणि पुस्तके लिहून प्रसिद्ध करायचे आणि त्यातून येणाऱ्या मिळकतीने संघटनेसाठी शस्त्र खरेदी करीत होते. मागितल्याने स्वातंत्र्य मिळणार नाही त्यासाठी रक्त सांडवणे गरजेचे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच एकमेव ब्रीद मानणारी ही संघटना होती. इंग्रज सरकारला जबर धक्का द्यायचा म्हणून 1925 मध्ये काकोरी रेल्वे लूट घडवून आणली. याच घटनेतील मुख्य आरोपी म्हणून बिस्मिलला इंग्रज सरकारने फाशी दिली. वक़्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमाँ। हम अभीसे क्या बताये क्या हमारे दिलमें है।सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमे है। देखना है जोर कितना बाजू ए महफ़िल में है। प्रसिद्ध शायर बिस्मिल अजीमाबाद...