कसला हा विचित्र खेळ तू बघितलं तर काळीज तृप्त होत, आणि नाही बघितलं तर लुप्त होत. माझा जीव मी तुझ्यावर ओवाळून फेकतो, तू फक्त हो म्हण, मी जग बदलून टाकतो… काळी साडी तुला दिसते छान, जशी एका रात्र पांघरलेल्या सुंदर राजहंसाची मान. पण नको तुला लिपस्टिकचा खोटा त्रास, सुंदर निसर्गाने उगाचच नाटक केल्याचा होतो भास. अग जसा गुलाबाच्या पाखळ्यांसारखे ओठाचा रंग सगळा परिसर खुलावतो, तसा माझा जीव मी तुझ्यावर ओवाळून फेकतो, तू एकदा हो म्हण हे जगच बदलून टाकतो… तू पहिली नसशील कदाचित हे तुला ऐकून नाही वाटणार बरं, पण तुझ्यासारखी कोणी भेटली नाही हेही तितकंच खरं. पण तू तरी कुठे मला दररोज भेटते, अधून मधून नजरेला नजर फक्त भेटते. तश्या झाल्या आपल्या एक दोनदा भेटी, पण मनाच्या नाही जुळल्या गाठी. तू हसली कि मी हि हसतो, कारण या हसण्यावर सुद्धा मी जीव ओवाळून फेकतो, तू फक्त हो म्हण मी जग बदलून टाकतो… फक्त सत्यात नाही तर स्वप्नात पण मला साथ दे, हृदयात नको पण तुझ्या गालावर थोडीशी जागा दे. चंद्र जसा तुझ्या गालावर खळी बनून आला, मी हि तसाच एक तीळ बनून येतो. कारण फक्त तुझ्यावरच जीव ओवाळून फेकतो, तू फक्त हो म्हण हे जग...
The land of Opportinity & Opprtuniest..