Skip to main content

ऍपलचा टाटा

#Tata कंपनी व #Apple... tata ने ॲपल मोबाईलचे ठराविक पार्ट बनविण्यासाठी पुढाकार घेतला असुन टाटा तमिळनाडूमध्ये प्रकल्प चालु करणार आहे..खाली आपण जाणुन घेऊ..
1)डील बद्दल..
2)#Titan चा सहभाग
3) तमिळनाडूच का?
इ..

टाटा कंपनीने ॲपल कंपनीच्या मोबाईलचे ठराविक भाग बनवण्याचा निर्णय घेतला असुन हा एक ऐतिहासिक निर्णय आहे.यासाठी टाटा ग्रुपने तमिळनाडू मधील चेन्नई जवळील 'होसुर' गाव ज्याला ब्रिटीश 'little England' म्हणायचे या गावात जवळपास ५००० करोड रुपयांचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकल्पासाठी टाटा ने #TATA_electronics नावाने नवीन कंपनी चालु केली असुन #TIDCO(Tamilnadu Industrial Development Corporation) या तमिळनाडूच्या सरकारी कंपनीने टाटाला होसुरमध्ये जवळपास ५०० एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे.या प्रकल्पाची किंमत ५००० करोड असली तरी भविष्यात ती ८००० करोड
होऊ शकते.मागील मंगळवारी प्रकल्पाचे भूमिपूजन देखील झाले असुन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे जवळपास १८००० लोकांच्या हाताला काम मिळणार आहे.कंपनीने १८००० कामगारांपैकी ९०% महिला कामगार ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे.ज्यामुळे महिला सबलीकरण-सशक्तीकरण सारखे अनेक मुद्दे मार्गी निघतील..
तुम्हाला माहितीय की ॲपलच्या जवळपास सगळ्या गोष्टी चीनमध्ये बनतात.पण सध्या ॲपलला चीनमधुन बाहेर पडायच आहे त्यामुळे त्यांनी भारताकडे नजर वळवली असुन देशात मनुष्यबळाची कमतरता नाही.भारतात जरी ॲपलने प्रवेश केला असेल तरी इथे मोबाईल Assembly केली जाते पण manufacturing सगळी चीनमध्ये होते..

#foxconn या कंपनीने चेन्नई जवळील श्रीपेरंबदुर या गावाजवळ #iPhone11 तयार करायचा प्रकल्प टाकला असला तरी पार्ट्स manufacturing #China मध्येच होत.पण टाटा भारतामध्येच पार्ट बनवायचा प्रयत्न करतील जेणेकरून भविष्यात मोबाईलच्या गगनचुंबी किंमती कमी झाल्यास नवल वाटायला नको!!!!
तुम्हाला वाटत असेल टाटा या क्षेत्रात का येत आहे??
तर केंद्र सरकारने जी #PIL(Productivity-Linked Incentive scheme) आणली आहे त्यापासुन फायदा मिळविण्यासाठी टाटा इकडे घुसलं आहे.PIL मध्ये केंद्र सरकार ११.५ लाख करोडची उलाढाल करणार असुन ज्या मोबाईल कंपन्या १५हजार आणि त्यावरील मोबाईल
तयार करत असतील त्या कंपन्यांना ४% ते ६% पर्यंतची सबसिडी incentive देण्याचा सरकारचा मानस आहे.जर कंपन्यां भारतीय असतील तर त्यांना या स्किमअंतर्गत २००करोड पर्यंतचा फायदा देण्याचे सरकारने घोषित केले आहे.आतापर्यंत एकुण १० कंपन्यांना ही योजना दिली असुन त्यातील ५ भारतीय व ५ विदेशी आहेत.
आता यामध्ये Titan चा नक्की काय विषय आहे पाहु...
Titan चा स्वताचा इंजिनिअर ग्रुप आहे ज्याला TEAL(Titan Engineering and Automation Limited) म्हणतात,
त्यातील हुशार तज्ञ इंजिनिअर या प्रकल्पात काम करणार आहेत.इथे अनेक जणांना वाटत असेल की Titan ही टाटांची एकहाती कंपनी आहे पण मित्रांनो
तस काही नसुन #Titan मध्ये टाटाचे २०% शेअर आहेत तर #TIDCO(तमिळनाडू सरकार) चे जवळपास २७.८८% शेअर #Share आहेत.Titan चा full form पाहिला तर तुम्हाला समजेल(Tata industries and Tamilnadu)..८० च्या दशकात स्थापन झालेली ही कंपनी आहे🙏🏻😄.सध्या मार्केटमध्ये चांगलाच जम बसला आहे या कंपनीचा..

तमिळनाडूचीच निवड का?
हा प्रकल्प आपल्या राज्यात आणण्यासाठी सुरूवातीला कर्नाटक आणि तमिळनाडू सरकारमध्ये खुप धुमश्चक्री झाली परंतु तमिळनाडू सरकारला त्यांच्या Favourable Policies ने तारलं.एकतर तमिळनाडुमध्ये सध्या Foxconn,#Dell,#Nokia,#Flex,#Samsung व Motorola अश्या अनेक कंपन्या आहेत व
दुसर म्हणजे आत्ताच तमिळनाडू सरकारने त्यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी policy जाहीर केली जिचं नाव 'Tamil Nadu Electronics Hardware Manufacturing Policy २०२०' असुन यानुसार २०२५ पर्यंत राज्यसरकार १००बिलीयन$ ची उलाढाल करण्यासाठी बांधील आहे.२०२५ पर्यंत देशाच्या एकुण निर्यातीच्या
२५% निर्यात एकट्या तमिळनाडू ची असावी अस सरकारच्या पाॅलिसीचं म्हणणं आहे..
बघुया आता भविष्यात हा प्रकल्प देशाला काय दिशा देतो व सरकारच्या #आत्मनिर्भर_भारत ला किती प्रोत्साहन देतोय..
या प्रकल्पामुळे #TATA,#Titan शेअर्समध्ये ही उलथापालथ होणार एव्हढ मात्र नक्की. 

Popular posts from this blog

ATALJI- THE GREAT LEADER

आज भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींजी यांचा जन्मदिवस. ---------------------------------------- वाजपेयीजींच्या कवितांच्या काही ओळी..... जो जितना उँचा, उतना एकाकी होता है, हरभार को स्वयं ढोता है, चेहरे पर मुस्काने चिपका, मन ही मन रोता है|       धरती को बौनो की नाहीं,  उँचे कद के इंसानो की जरुरत है| इतने ऊँचे की आसमान छू लें,नये नक्षत्रों मे प्रतिभा की बीज बो लें,      किंन्तु इतने ऊँचे भी नहीं,      कि पाँव तले दूब ही न जमे,      कोई काटा न चुभे,      कोई कली न खिले| मेरे प्रभु! मुझे इतनी उँचाई कभी मत देना, गैरों को गले न लगा सकूँ, इतनी रुखाई मत देना| अटल बिहारी वाजपेयींजी ----------***---------***------- हम पडाव को समझे मंजिल लक्ष्य हुआ आँखों से ओझल वर्तमान के मोहजाल में आने वाला कल न भुलाएँ आओ फिर से दिया जलाएँ आहुती बाकी यज्ञ अधुरा  अपनों के विघ्नों ने घेरा अंतिम जय का वज्र बनाने नव दधीचि हड्डियां गलाएँ आओ फिर से दिया  जलाएँ, -------***--------***-------- भारत जमीन का टुकडा नहीं...

कॅप्टन विक्रम बत्रा

विषय :-कॅप्टन विक्रम बत्रा भारतीय सैन्याच्या अदम्य साहसाचा अनेक कहाण्या आहेत ज्याने,काही क्षणासाठी का होईना आपण भारावून जातो!हि अशीच एक कहाणी अश्या एक सैनिकाची ज्याचे नाव घेतले कि आजहि आपोआप ओठावर बोल येतात,'ये दिल मांगे मोर'. हि कहाणी आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांची! ९ सप्टेंबर १९७४ साली हिमाचल मध्ये कमल कांत आणि गिरिधारी लाल बत्रा यांच्या पोटी विक्रम चा जन्म झाला आणि बरोबर १४ मिनिटाने विशाल म्हणजे विक्रम च्या जुळ्या भावाचा जन्म झाला ,विक्रम अगदी लहानपणा पासून त्यांच्या शाळेत एक हुशार आणि प्रत्येक गोष्टी मध्ये उत्सहाने भाग घेणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता.उत्तर भारतातील सर्वोत्तम NCC कॅडेट म्हणून त्याने नाव अगदी लहानपणीच कमावले आणि वयाच्या १२ व्या वर्षी कराटे मध्ये ग्रीन बेल्ट सुद्धा मिळवला विक्रम हा राष्ट्रीय पातळीचा टेनिस पटू सुद्धा होता. लहानपणा पासून देशभक्त असलेल्या विक्रम ने आर्मी जोईन करायचे ठरवले आणि त्याने CDS हि परीक्षा दिली. विक्रम च्या बॅचलर डिग्री वर त्याला हाँग कोन्ग स्थित मर्चन्ट नेव्ही च्या कंपनीत भरपूर पगार असलेली नोकरी लागली होती ...

सरफ़रोशी की तमन्ना ११ जून

अगदी सहजतेने मनातील देशभक्ती शायरीच्या आणि लेखणी च्या माध्यमातून उतरवणारे, तितक्याच निपुणतेने इंग्रजांविरुद्ध बंदूक चालवणारे रामप्रसाद बिस्मिल यांचा आज जन्मदिन. लेखणी आणि बंदूक हे दोन्ही परस्परविरोधी शस्त्र सहसा एकत्रित येऊ शकत नाहीत. पण बिस्मिल अपवाद होते. क्रांतीकारकांना शस्त्रास्त्रे विकत घेण्यासाठी आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) ही संघटना चालविण्यासाठी पैश्याची गरज होती. बिस्मिल शायरी आणि पुस्तके लिहून प्रसिद्ध करायचे आणि त्यातून येणाऱ्या मिळकतीने संघटनेसाठी शस्त्र खरेदी करीत होते. मागितल्याने स्वातंत्र्य मिळणार नाही त्यासाठी रक्त सांडवणे गरजेचे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच एकमेव ब्रीद मानणारी ही संघटना होती. इंग्रज सरकारला जबर धक्का द्यायचा म्हणून 1925 मध्ये काकोरी रेल्वे लूट घडवून आणली. याच घटनेतील मुख्य आरोपी म्हणून बिस्मिलला इंग्रज सरकारने फाशी दिली. वक़्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमाँ। हम अभीसे क्या बताये क्या हमारे दिलमें है।सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमे है। देखना है जोर कितना बाजू ए महफ़िल में है। प्रसिद्ध शायर बिस्मिल अजीमाबाद...