अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी लावलेल्या शोधावर अणुबॉम्बची निर्मिती झाली मात्र अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी जगाला यातुन काय वाईट घडू शकत याची चेतावणी दिली होती.असच काही २०१६ मध्ये मानसशास्त्राच्या बाबतीत घडलं.केम्ब्रिज ऍनालीटीकाचाअणुबॉम्ब भारत व अमेरिकेच्या लोकशाही वर पडला.
David Stillwell and Michal Kosinski या केम्ब्रिज विद्यापीठात काम करणाऱ्या मानसशास्त्रद्यांनी प्रयोगात्मक पद्धतीने ५८,००० लोकांवर प्रयोग करून असा निष्कर्ष काढला की openness, conscientiousness, extraversion, agreeableness and neuroticism या Big Five Personality Traits या
या मानसशास्त्रीय चाचणीचा उपयोग करून फेसबुक च्या likes/comments वरून Introvert/Extrovert (अंतर्मुखी/बहिर्मुखी) व स्वभावाच्या इतर बाबींच अनुमान लावून त्या व्यक्तीला काय आवडेल या पद्धतीने ‘microtargeting’ करून काही प्रमाणात आवडत्या गोष्टी/सेवा विकणे शक्य आहे.
Dean Ecklesच्या मते फेसबुकच्या Likes वरून एखाद्या व्यक्तीच Big Five Personality Traits profile बनवणं शक्य आहे म्हणजे त्या व्यक्तीला ती मानसशास्त्रीय चाचणी देणे गरजेचे नाही तर त्याच्या फेसबुक डेटा वरून त्या व्यक्तीच व्यक्तिमत्व कस असेल(जे जडणघडणीतून पक्के झाले असते,स्थिर असते)
हे आरामात ओळखता येत.२०१४ मध्ये या मानसशास्त्रज्ञ Aleksandr Kogan यांनी "This Is Your Digital Life," नावाची App बनवून त्यात psychographic marketing चा यशस्वी वापर करून दाखवला. हेच तंत्र केम्ब्रिज ऍनालीटीका ने वापरून डोनाल्ड ट्रम्प ला जिंकून आणलं व हेच तंत्रज्ञान वापरून २०१४
पासून भारतात "अच्छे दिन " सुरु झालेत. पुढे Aleksandr Kogan यांनी मला या शोधाचा असा वापर होईल माहित नव्हतं म्हणून हात वर केले.
सध्या मात्र फेसबुक चा डेटाच नाही तर एकंदरीत डिजिटल पाऊलखुणा वापरून ज्यात आपले कॉल्स, सोशल मीडिया व गूगल ची browsing history यावरून सुद्धा मानवी
स्वभावाचे बऱ्यापैकी अचूक निदान शक्य आहे ज्याचा उपयोग आपलं वर्तुणूकीत बदल घडवायला होऊ शकतो किंबहुना होत आहे. मी स्वतः पदवी पर्यंत गणित व पदव्युत्तर शिक्षण हे organizational psychology मध्ये घेतल्याने मला अनेक वेळा अश्या पद्धतीचा सर्व्हे ज्यात लोकांची personality ओळखून त्यांचं
मत वळविणे किंवा अंदाज बांधणे तयार करण्यासाठी विचारणा झाली आहे ज्याला मी नाही म्हंटले कारण हे असले प्रकार माणसाच्या वैचारिक स्वातंत्र्यावर घाला आहे. लोकांना आपल्या तालावर नाचविणे म्हणजे हुकूमशाही आहे. परंतु अश्या गोष्टी करणारे तज्ञ आहेत ज्यामुळे "मत" वळवून पक्के तयार करणे हे
गेल्या काही वर्षात भारतात शक्य झाले आहे.
मला स्वतःला अनेकवेळा प्रोफाईल च content किंवा पोस्ट बघून जाणवत की काहीतरी बिनसलं आहे. माझ्यापरीने मी सांगण्याचा प्रयज्ञ करते व माझ्या आतपर्यंत लिहिलेल्या अनेक लेखातून व थ्रेड मधून हा विषय नेहमी मांडते जेणेकरून सर्वसामान्य लोकांना
त्यांचा मेंदू वाचला जातोय हे कळावं.
यावर उपाय काय ?
खरतर आधी सांगितल्याप्रमाणे २५ च्या अगोदर स्मार्टफोन वापरू नये कारण मेंदूची पूर्ण वाढ न झाल्याने दारू, सिगरेट प्रमाणे इंटरनेट च पण व्यसन लागत व ते जात नाही. ते मेंदूची रचना बदलवत ज्याला पूर्ववत करणं अशक्य आहे.
२५ वर्ष वयानंतर जर वापरायला सुरवात केली असेल काहीही डिजिटल पाऊल टाकण्यापूर्वी विचार करा कारण इंटरनेट वर आपला तार्किक मेंदू चालत नाही, जी असते ती भावनिक प्रतिक्रिया असते. मोठ्या लोकांनी पण इंटरनेट विचारपूर्वक वापरा कारण आपण ते वापरत असताना इंटरनेट सुद्धा आपला वापर करत असते.
प्रत्यक्ष बोला, भेट, फोन करा. डिजिटल देवाणघेवाणीवार अवलंबून राहू नका. जी व्यक्ती असं भेटायला व बोलायला नकार देत असेल तिच्याशी संबंध ठेवू नका कारण कोण पडद्याडून बोलतंय हे कळत नाही.
आपला डिजिटल "स्व" व प्रत्यक्ष "स्व" यातील सरमिसळ टाळण्यासाठी "totem" वापरणं गरजेचे आहे नाहीतर
दोन्ही "स्व" एकत्र येऊन आपण Inception या सिनेमात दाखवल्या प्रमाणे Limbo मध्ये नेहमीकरता अडकून राहू म्हणजे अशी जागा ज्यातून बाहेर पडणे मुश्किल आहे.
"Are you willing to take a leap of faith, or become an old man filled with regret, waiting to die alone?"
©VrushaliRautPHD