Skip to main content

भगिनी निवेदिता

विम्बल्डन सेंटर कोर्टपासून दक्षिणेला एक - दीड किलोमीटर चालत गेल्यावर विम्बल्डन हायस्ट्रीट लागतो. ह्या हायस्ट्रीटवर बरीच छोटीछोटी दुकानं आणि रेस्तरॉं आहेत. इथल्या २१ए नंबरमध्ये ‘ब्रू’ नावाचं एक छोटंस रेस्तरॉं आहे. हे रेस्तरॉं हा आजचा विषय नाहीये. आजचा विषय आहे त्या रेस्तरॉंवर असलेली - इंग्लिश हेरिटेजने लावलेली - एक छोटीशी निळी गोल पाटी. ह्यावर लिहीलंय की ‘Sister Nivedita (Margaret Noble) 1867 - 1911 Educationalist and Campaigner for Indian Independence lived here’ (भावार्थ: भगिनी निवेदिता (मार्गारेट नोबेल) १८६७-१९११ शिक्षणतज्ञ आणि भारतीय स्वातंत्र्याच्या प्रचारक इथे रहात होत्या)


मार्गारेट नोबेलचा जन्म २८ ऑक्टोबर १८६७ चा. आईवडील स्कॉटीश पण अनेक पिढ्या आयर्लंडमध्येच राहिलेल्या. आपण शिक्षिका व्हावं हे मार्गारेटचं स्वप्न.
वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी - १८८४ मध्ये - तिने शिक्षिकेची नोकरी पत्करली. नोकरीनिमित्त ती अनेक भागांत राहिली. शेवटी १८९१ मध्ये ती विम्बल्डनमध्ये तिच्या आईसोबत रहायला आली. (ह्याच घरावर ती निळी पाटी आहे.) नोव्हेंबर १८९५ मध्ये लंडनमध्ये ३ महिने वास्तव्यासाठी आलेल्या स्वामी विवेकानंदांना ती पहिल्यांदा भेटली. त्यांच्या उपदेशावरून ती १८९८ मध्ये पहिल्यांदा कलकत्त्याला गेली. २५ मार्च १८९८ रोजी विवेकानंदांनी तिला ‘भगिनी निवेदिता’ हे नाव आणि आजन्म ब्रह्मचर्याची दीक्षा दिली. ‘रामकृष्ण मिशन’ च्या जडणघडणीत तिचा फार मोठा वाटा होता.

 
वंदे मातरम्’ हे गीत शाळांमध्ये प्रार्थना म्हणून म्हणायची कल्पना हिनेच सर्वप्रथम अंमलात आणली. भारतात भारतीयांना भारतीय पध्दतीने शिक्षण दिले जावे ह्याबद्दल ती आग्रही होती. हिंदू तत्वज्ञान आणि विशेषकरून वेदांत ह्यांच्या अभ्यासात तिला विशेष आवड होती. हिंदू धर्म आणि तत्वज्ञानावर हिने दहापेक्षा जास्त पुस्तकं लिहीलेली आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी बनलेली बंगालमधील सर्वप्रथम क्रांतीकारी संस्था - ‘अनुशीलन समिती’मधल्या क्रांतिकारकांच्याही ती खास संपर्कात होती. लपूनछपून त्यांना ती मदत करत होती. १९०५ सालच्या बंगाल फाळणीविरोधात तिने तिच्या भारतातल्या आणि इंग्लंडमधल्या भरपूर ओळखी वापरून क्रांतीकारकांना अनेकदा गुप्त बातम्या पुरवल्या. डॉ ॲनी बेझंट आणि ऑरोबिंदो घोषांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात मार्गदर्शनही हिनेच केले. भारतीय शास्त्रज्ञ डॉ जगदीशचंद्र बोस ह्यांना ती तिचा मुलगा मानत असे.
त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ती वेळोवेळी आर्थिक मदत आणि मार्गदर्शन करत असे. भारतभर प्रवास करून ती जणू भारताचाच एक हिस्सा बनली होती. १३ ऑक्टोबर १९११ रोजी दार्जीलिंगमध्ये तिचा पोटाच्या विकाराने मृत्यू झाला. तिच्या तिथल्या समाधीवर लिहीले आहे - ‘ही भगिनी निवेदिताची समाधी आहे - जिने आपले सर्वस्व भारतासाठी दिले’.


२८ ऑक्टोबर १८६७ चा जन्म आणि १३ ऑक्टोबर १९११ चा मृत्यू. ह्या दोन्ही ऑक्टोबरमधल्या तारखा होऊन केलेल्या आहेत पण आज हिंदू धर्म आणि तत्वज्ञान ह्यांचा स्वीकार करणारी मार्गारेट नोबेल आपल्या कोणाच्या लक्षात आहे का? ते जाऊदे - लॉर्ड मेकॉलेच्या इंग्रजधार्जिण्या शिक्षणपध्दतीला विरोध करून भारतीय शिक्षणपध्दतीचा प्रचार करणारी मार्गारेट नोबेल आपल्या कोणाच्या लक्षात आहे का? तेपण जाऊ दे - बंगालच्या क्रांतिकारकांसोबत मिळून भारताला इंग्रजी सत्तेपासून स्वातंत्र्य मिळावे ह्यासाठी प्रयत्न करणारी मार्गारेट नोबेल आपल्या कोणाच्या लक्षात आहे का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच आहेत. पण ह्याने काय फरक पडतो? जाऊ दे ना. आपण आपल्या दिनक्रमांत मस्त राहूयात. चित्रपटांबद्दल - राजकारणाबद्दल आणि राजकारण्यांबद्दल - आयपीएलबद्दल - आणि तत्सम अनेक निरर्थक विषयांवर आपली आपापसातली वंध्य चर्चासत्रे आपण चालू ठेवूयात. आपल्या संपूर्ण विस्मरणात गेलेल्या मार्गारेट नोबेलसारख्या प्रभृतींची यादी ‘इंग्लिश हेरिटेज’ ठेवतं आहेच की. मग झालं तर! आपण कशाला आपला बहुमूल्य वेळ असल्या फालतू गोष्टींत घालवा - नाही का?

Popular posts from this blog

ATALJI- THE GREAT LEADER

आज भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींजी यांचा जन्मदिवस. ---------------------------------------- वाजपेयीजींच्या कवितांच्या काही ओळी..... जो जितना उँचा, उतना एकाकी होता है, हरभार को स्वयं ढोता है, चेहरे पर मुस्काने चिपका, मन ही मन रोता है|       धरती को बौनो की नाहीं,  उँचे कद के इंसानो की जरुरत है| इतने ऊँचे की आसमान छू लें,नये नक्षत्रों मे प्रतिभा की बीज बो लें,      किंन्तु इतने ऊँचे भी नहीं,      कि पाँव तले दूब ही न जमे,      कोई काटा न चुभे,      कोई कली न खिले| मेरे प्रभु! मुझे इतनी उँचाई कभी मत देना, गैरों को गले न लगा सकूँ, इतनी रुखाई मत देना| अटल बिहारी वाजपेयींजी ----------***---------***------- हम पडाव को समझे मंजिल लक्ष्य हुआ आँखों से ओझल वर्तमान के मोहजाल में आने वाला कल न भुलाएँ आओ फिर से दिया जलाएँ आहुती बाकी यज्ञ अधुरा  अपनों के विघ्नों ने घेरा अंतिम जय का वज्र बनाने नव दधीचि हड्डियां गलाएँ आओ फिर से दिया  जलाएँ, -------***--------***-------- भारत जमीन का टुकडा नहीं...

कॅप्टन विक्रम बत्रा

विषय :-कॅप्टन विक्रम बत्रा भारतीय सैन्याच्या अदम्य साहसाचा अनेक कहाण्या आहेत ज्याने,काही क्षणासाठी का होईना आपण भारावून जातो!हि अशीच एक कहाणी अश्या एक सैनिकाची ज्याचे नाव घेतले कि आजहि आपोआप ओठावर बोल येतात,'ये दिल मांगे मोर'. हि कहाणी आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांची! ९ सप्टेंबर १९७४ साली हिमाचल मध्ये कमल कांत आणि गिरिधारी लाल बत्रा यांच्या पोटी विक्रम चा जन्म झाला आणि बरोबर १४ मिनिटाने विशाल म्हणजे विक्रम च्या जुळ्या भावाचा जन्म झाला ,विक्रम अगदी लहानपणा पासून त्यांच्या शाळेत एक हुशार आणि प्रत्येक गोष्टी मध्ये उत्सहाने भाग घेणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता.उत्तर भारतातील सर्वोत्तम NCC कॅडेट म्हणून त्याने नाव अगदी लहानपणीच कमावले आणि वयाच्या १२ व्या वर्षी कराटे मध्ये ग्रीन बेल्ट सुद्धा मिळवला विक्रम हा राष्ट्रीय पातळीचा टेनिस पटू सुद्धा होता. लहानपणा पासून देशभक्त असलेल्या विक्रम ने आर्मी जोईन करायचे ठरवले आणि त्याने CDS हि परीक्षा दिली. विक्रम च्या बॅचलर डिग्री वर त्याला हाँग कोन्ग स्थित मर्चन्ट नेव्ही च्या कंपनीत भरपूर पगार असलेली नोकरी लागली होती ...

सरफ़रोशी की तमन्ना ११ जून

अगदी सहजतेने मनातील देशभक्ती शायरीच्या आणि लेखणी च्या माध्यमातून उतरवणारे, तितक्याच निपुणतेने इंग्रजांविरुद्ध बंदूक चालवणारे रामप्रसाद बिस्मिल यांचा आज जन्मदिन. लेखणी आणि बंदूक हे दोन्ही परस्परविरोधी शस्त्र सहसा एकत्रित येऊ शकत नाहीत. पण बिस्मिल अपवाद होते. क्रांतीकारकांना शस्त्रास्त्रे विकत घेण्यासाठी आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) ही संघटना चालविण्यासाठी पैश्याची गरज होती. बिस्मिल शायरी आणि पुस्तके लिहून प्रसिद्ध करायचे आणि त्यातून येणाऱ्या मिळकतीने संघटनेसाठी शस्त्र खरेदी करीत होते. मागितल्याने स्वातंत्र्य मिळणार नाही त्यासाठी रक्त सांडवणे गरजेचे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच एकमेव ब्रीद मानणारी ही संघटना होती. इंग्रज सरकारला जबर धक्का द्यायचा म्हणून 1925 मध्ये काकोरी रेल्वे लूट घडवून आणली. याच घटनेतील मुख्य आरोपी म्हणून बिस्मिलला इंग्रज सरकारने फाशी दिली. वक़्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमाँ। हम अभीसे क्या बताये क्या हमारे दिलमें है।सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमे है। देखना है जोर कितना बाजू ए महफ़िल में है। प्रसिद्ध शायर बिस्मिल अजीमाबाद...