केरळमधीर कोल्लम जिल्ह्यात पवित्रेश्वरम नावाच्या गावात Strychnos Nux Vomica अर्थात काजरा किंवा कुचल्याच्या विस्तीर्ण झाडाखाली एक ग्रेनाईट ची शिळा आहे. ही शिळा एका (खल) नायकाची प्रतिकृती म्हणून पुजली जाते.
कुचल्याच्या बियांतले 20 ते 30 मि.ग्रैम स्ट्रिक्निन पोटात गेले तर प्राणघातक ठरू शकते. यावरून तिव्रता कळेल विषाची. मग 'कुरूक्षेत्रावरचा' रणसंग्राम कसा थांबणार होता.?
सध्याच्या अफगाणिस्तान मध्ये असणाऱ्या एका साम्राज्याच्या युवराजाने अख्खं महाभारत घडवलं फक्त बहिणीच्या प्रेमापोटी.
गांधार..गांधारनरेश सुबलाचा पुत्र 'शकुनी' आजच्या कथेचा नायक आहे. शकुनी व्यक्ती नव्हता वृत्ती होता, आहे आणि राहील. जगाच्या पाठीवर हिणवलेल्या गेलेल्या शकुनी वृत्तीचं मंदिर ते पण एकमेव केरळमध्ये आहे.
बी.आर.चोप्रांच्या महाभारतात शकुनी सहदेवाच्या हाताने मेला. पण तो आजही जिवंत आहे.
हां..म्हणजे सप्तचिरंजीवींमध्ये शकुनीचं नांव नाहीये पण तो तुमच्यात-माझ्यात, आपल्या आजूबाजूला आणि राजकारणी म्हणवणाऱ्या अनेकांत असतो आणि सापडतो वेळोवेळी.
तर.. आपला शकुनी गांधारचा राजपुत्र आहे, धृतराष्ट्राचा मेव्हणा, गांधारीचा लाडका भाऊ आणि अजरामर खलनायक दुर्योधनाचा मामा पण आहे.
गंगापुत्र भिष्मांनी हस्तिनापुरच्या अंध राजपुत्रासाठी गांधारीचा हात मागितला ही पहिली ठिणगी होती महाभारत सुरू होण्याची. एकुलती एक गांधारी..जिला अंधाराची प्रचंड भिती होती..जिथे जाईल तिथे दिव्यांची आरास जिच्यासाठी केली जायची तिचा विवाह अंध राजपुत्रासोबत..? भिष्मांनी यावं, प्रस्ताव..
ठेवावा आणि आपण तो मान्य करावा..? सहज पचणारी गोष्ट नव्हती. आपल्यापैकी कोणीही असते तरी पहिला नकारच असता.
येथे सुरवात होते वेगळ्या कथेची.. काही जैन ग्रथांनुसार.. हस्तिनापुर आणि गांधार मध्ये झालेल्या युद्धात हस्तिनापुर जिंकले सुबला सह त्याचे 100 पुत्र बंदी करण्यात आले आणि प्रत्येक..
कैद्याला धान्याचा फक्त एक कण रोज द्यावा असा आदेश देण्यात आला. सर्व 99 जणांनी आपला एक कण शकुनी ला द्यावा. त्याने जिवंत रहावे आणि या अपमानाचा बदला घ्यावा या नकारात्मक विचारांनी भारलेला प्रत्येक कण खाऊ घालूध शकुनीच्या कपटबुद्दीला धार चढवण्यात आली. मांगलिक गांधारी विवाह करून आणि..
शकुनी दास म्हणून हस्तिनापुरच्या राजमहालात दाखल झाला. मांगलिक मुलीचा पहिला विवाह हा एखाद्या झाडाशी किंवा प्राण्याशी लावून देऊन मग धृतराष्ट्राशी लावण्यात आला. हा प्रसंग क्रमांक दोन ज्याने शकुनीच्या ह्रदयात सुडाचा ज्वालामुखी प्रज्वलीत केला.
स्वतःजवळची कट्यार मांडीत खुपसून..
शकुनीने सुडाचा ज्वालामुखी कायम चेतवून ठेवला. (म्हणून तो लंगडत चालत असे) स्वतःच्या भावांच्या आणि वडिलांच्या अस्थिंपासून बनवलेल्या सोंगट्या ज्यांनी चौरस (जुगार) मध्ये शकुनीचं मागितलेलं दान रिकामं जाऊ दिलं नाही. उद्देश फक्त बदला. हस्तिनापुरचा समूळ विध्वंस.
पायाने अधू झालेला शकुनी कधीच उघड युद्ध करून हेतु साध्य करू शकत नव्हता. चौसर आणि दुर्योधनाचं पांडवांप्रतीचं कलूषित मन हेच त्याचे हत्यार होते. खेळ सुरू झाला होता. गुरूकूलात शिकणाऱ्या 105 युवराजांचे 100 विरूद्ध पाच अशी सरळ विभागणी करण्यात शकुनी यशस्वी झाला. भिमावर केलेले दोन..
विषप्रयोग, पुरोचनाकडून लाक्षागृहाची निर्मीती, द्रौपदीच्या वस्त्रहरणाचं चौरस कांड आणि कुरूक्षेत्रात नकुल सहदेवाच्या मामाला 'शल्याला' सैन्यासह कौरवांच्या बाजूने वळवणारा शकुनी. महाभारताचा खरा खलनायक होता. हस्तीनापुरच्या तिन पिढ्यांना कुरूक्षेत्राच्या युद्दात लोटणारा शकुनी..
फक्त एकाला घाबरत असे.. श्रीकृष्ण.
कुरूक्षेत्राचे युद्ध व्हावे ही श्रीकृष्णाची पण इच्छा होती. कुंती, तिची पाच मुले आणि द्रौपदीच्या अपमानाचा सुड उगवण्यासाठी.
चौरसात जरासंधाच्या हाडांच्या सोंगट्या वापरून ज्या भिमाच्या आवाजाने थरथरून सगळे दान शकुनीच्या पारड्यात टाकत होत्या..
आणि प्रत्येक दानावेळी कुरूक्षेत्राच्या धर्म-अधर्माच्या युद्धाची कथा लिहीत होत्या. भिष्मापासुन अभिमन्यु पर्यंतच्या पिढीतील कित्येक शुरवीरांना स्वतःच्या हट्टापायी मातीत मिसळवणारा शकुनी प्रत्येकवेळी हरतांना दिसायचा पण तो जिंकत होता.
सहदेवासोबत तलवारबाजीतल्या पराभवाने शकुनी..
महाभारतात हरला पण त्यानंतर तो प्रत्येकवेळी जिंकत गेला..जिंकतोय आणि जिंकत राहणार.
1) सख्या भावांमध्ये संपत्तीवरून द्वेष.. शकुनी जिवंत आहे.
2) पैसा आणि प्रसिद्धी साठी हपापलेल्या वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवणार्या प्रत्येकात.. शकुनी जिवंत आहे.
3) सत्तेसाठी हापापलेल्या..
प्रत्येक राजकारण्याच्या वृत्तीत.. शकुनी जिवंत आहे.
शकुनी व्यक्ती कमी विचार जास्त..
शकुनी वृत्ती आहे..
Strychnos Nux Vomica च्या विषारी बियांप्रमाणे.
जिथे प्रचंड नकारात्मकता आहे तिथे तिथे शकुनी आहे.
तुम्हांला तुमच्या आजूबाजूला शकुनी भेटत असतील हल्ली..दुसऱ्यांतील शकुनी शोधतांना स्वतः मध्ये नसेल याची खात्री करा मित्रांनो.